वास्तुशास्त्र ही परंपरागत भारतीय वास्तूशास्त्र प्रणाली आहे.प्राचीन भारतीय वास्तू शास्त्र ग्रंथांमध्ये वास्तू संरचना, जमिनीचा गंध, चढ-उतारांची दिशा आणि स्थानिक भूमिती या तत्वांचे वर्णन केले आहे. वास्तुशास्त्रामध्ये पारंपरिक हिंदू आणि बौद्ध श्रद्धा समाविष्ट आहेत.
आपण ज्या वातावरणात राहतो ते आपल्यावर शारीरिक आणि भावनिक दोन्ही प्रकारे प्रभाव पाडतात. घरे जरी ऊन ,पाऊस, वारा यांपासून आपले रक्षण करत असले तरीही ते आपल्या मानसिकतेवरही परिणाम करतात हे विसरून चालणार नाही आणि यामुळे आपल्या वर्तमान आणि भविष्यावर परिणाम होत असतो. हाच नियम कोणत्याही वास्तूसाठी लागू होतो जसे की ऑफिस, रेस्टॉरंट, व्यावसायिक वास्तू इत्यादी.
आपली जीवनशैली सुधारण्यासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी आपण राहतो ते घर जर वास्तुशास्त्रानुसार नसेल तर योग्य मार्गदर्शनाने त्यामध्ये आपण निश्चित सुधारणा करू शकतो. अशा प्रकारची सुधारणा व्यवसायिक वास्तूत करता येते ज्यायोगे समृद्धी, शांतता, आरोग्य, वास्तूत नांदणाऱ्या व्यक्तींना मिळेल.
यासाठी आपण श्री. गौरव देशपांडे यांचा सल्ला घेऊ शकता.