अशा स्वरुपाची महाराष्ट्रातील एकमेव शास्त्रशुद्ध दिनदर्शिका प्रकाशित

800.00

‘न भूतो न भविष्यति‘ अशा स्वरुपाची महाराष्ट्रातील एकमेव शास्त्रशुद्ध दिनदर्शिका प्रकाशित-

आमच्या लाखो चाहत्यांचे उदंड प्रेम व प्रतिसादामुळे देशपांडे पंचांगकर्ते यांच्या देशपांडे दिनदर्शिकेची(Calendar) आवृत्ती सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते कृत शास्त्रशुद्ध देशपांडे पंचांग दिनदर्शिका(calendar)…
दिनदर्शिकेची वैशिष्ट्ये–

✅1) प्रत्येक तारखेला सणवार, दिनविशेष, रोजची तिथी, नक्षत्र, योग, करण, सूर्योदय-सूर्यास्त या अचूक वेळांची माहिती. थोडक्यात हे कॅलेंडर बघितले की पंचांग उघडण्याची आवश्यकता नाही. तिथी, नक्षत्र, योग, करण यांच्या समाप्ती वेळा प्रत्येक तारखेला दिल्या आहेत.

✅2) इतर कोणत्याही प्रचलित दिनदर्शिकेत देत नाहीत असे पंचक, अमृतसिद्धियोग, सर्वार्थसिद्धियोग, रवियोग,भद्रा इत्यादी योगांची वेळेसह माहिती. अमृतसिद्धियोग, सर्वार्थसिद्धियोग,रवियोग यांसारखे शुभ योग बघून कोणताही महत्त्वाचा निर्णय अगर महत्त्वाचे काम आपण यशस्वीपणे पार पाडू शकता.

✅3) खास पुरोहितांसाठी प्रत्येक तारखेला ‘पृथ्वीवरअग्निवास’ आहे का नाही ते दिनदर्शिकेत नमूद केलेले असल्यामुळे हवन, शांती इत्यादी साठी पंचांग उघडायची आवश्यकता नाही. फक्त तारीख बघितली की एका दृष्टीक्षेपात अग्निवास कळून येणार.

✅4) धर्मशास्त्रीय शंका-समाधान , सणवार, व्रते, ज्योतिष, आयुर्वेद ,आरोग्य, उपासना यांसारखे सर्व विषय शास्त्रशुद्ध पद्धतीने दिलेले आहेत.

✅5)तब्बल ६४ गावांचे संकष्टी चतुर्थीचे चंद्रोदय देण्यात आलेले आहे.

✅6) सरकारी सुट्या व बहुतांशी सत्पुरुषांचे जयंती व पुण्यतिथी उत्सव देण्यात आलेले आहेत.

विषय कोणताही असो. शास्त्रशुद्ध, धर्मशास्त्र संमत व उपयुक्त माहिती हेच आमचे वैशिष्ट्य !!!

SKU: Chairs Category:

Description

The product is High quality with multi options and colors. high efficiency, performance and What separates Westy from all other web design agencies is the ability to offer the most Friendly Experience you can imagine nulla metus metus ullamcorper vel tincidunt sed.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अशा स्वरुपाची महाराष्ट्रातील एकमेव शास्त्रशुद्ध दिनदर्शिका प्रकाशित”

Your email address will not be published. Required fields are marked *