ज्येष्ठमास कृत्यं

1. मिथुन संक्रांति पुण्यकाल – मिथुन संक्रांति पुण्यकालात (दिनांक 15 जून – 13.17 ते सूर्यास्त) विश्वामित्र ऋषींच्या ‘वस्त्रान्नपानदानानि मिथुने विहितानि तु |’ या वचनानुसार मिथुन संक्रांति पुण्य कालात वस्त्र, अन्न व पेयपदार्थ यांचे दान द्यावे. दानाचा संकल्प – ‘मम समस्त उपात्त दुरितक्षयद्वारा आयुरारोग्य ऐश्वर्य अभिवृद्धीद्वारा श्रीसवितृसूर्यनारायणदेवता प्रीत्यर्थ मिथुनसंक्रांती पुण्यकाले (अमुक) दानमहं करिष्ये|’ तसेच ‘ संक्रांतौ यानि दानानि हव्यकव्यानि दातृभि:| तानि नित्यं ददात्यर्कः पुनर्जन्मानि जन्मनि|’ या शातातप ऋषिंच्या वचनानुसार संक्रांती पुण्यकालात ज्या वस्तू दान केल्या जातात त्याच वस्तू सूर्यनारायण जन्मोजन्मी दात्यास परत करत असतो. 

2. जेष्ठशुक्लचतुर्थ्यां तु जाता पूर्वमुमासती| तस्मात्सा तत्र संपूज्या स्रीभिः सौभाग्यव्रुद्धये || जेष्ठ शुक्ल चतुर्थीस दिनांक 14 जून उमेचा जन्म झाल्याने त्या दिवशी तिचे पूजन केल्यास स्त्रियांची सौभाग्यवृद्धी होते.

3. वृषस्थे मिथुनास्थे वा शुक्लाह्योकादशी भवेत्| ज्येष्ठमासे प्रयत्नेन सोपोष्या जलवर्जिता|| सर्वतीर्थेषु यत्पुणं सर्वतीर्थेषुयत्फलं| सर्वहोमेषु यत्पुण्यंतदस्यास्यमुपोषणात्|| जेष्ठ शुक्ल 11 ला (दिनांक 21 जून) निर्जल उपवास केल्यास सर्व तीर्थात स्नान केल्याचे तसेच सर्व यज्ञाचे फळ मिळते. द्वादशीच्या दिवशी उपवास सोडण्यापूर्वी सुवर्ण व साखर यांनी युक्त पाण्याचा कलश ब्राह्मणास पुढील संकल्प करून दान करावा. संकल्प : द्वादशां च निर्जलोपोषित एकादशीव्रतांगत्वेन सहिरण्यसशर्करोदकुंभदानं करिष्ये| सुवर्ण व साखर यांनी युक्त पाण्याचा कलश ब्राह्मणास दान देताना म्हणायचा मंत्र खालील प्रमाणे. देवदेव ऋषिकेश संसारार्वणवतारक| उदकुंभ प्रदानेन यास्यामि परमां गतिम् ||

4. ज्येष्ठ पौर्णिमास्यां तिलदानादश्वमेधफलम्| ज्येष्ठानक्षत्रयुतायां छत्रोपनहदानान्नराधिपत्यप्राप्ति:|| ज्येष्ठ पौर्णिमा (दिनांक 24 जून) तीळ दान केल्यास अश्‍वमेध यज्ञाचे फळ मिळते. तसेच ज्येष्ठ पौर्णिमेस ज्येष्ठा नक्षत्र असताना छत्री व जोडे दान केल्याने राज्य प्राप्ती होते.

Leave A Comment